प्रथम 10तक न्यूज
मुंबई समाचार


*विशेष पुढाकार घेऊन महाराष्ट्र भवनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल*
*लंडन मधील मराठीजनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार*

मुंबई, :- लंडन मधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या वतीने ट्रस्टी वैभव खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “लंडनमधील मराठी बांधवांसाठी स्वतःचे सांस्कृतिक भवन असावे, ही आमची दीर्घकाळची मागणी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे.”

महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील सर्वात जुनी मराठी संस्था असून तिची स्थापना १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी केली होती. स्थापनेपासून भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या या संस्थेला अखेर स्वतःचे भवन मिळणार आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे लंडनमधील मराठी बांधवांसाठी केवळ सांस्कृतिक केंद्रच ठरणार नसून महाराष्ट्र शासन व युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे.
*****

oplus_0

मनोज वर्मा (स्वतंत्र)
प्रधान संपादक
प्रथम 10तक न्यूज , राष्ट्रीय दैनिक
शेट्टी टाईम्स समाचार पत्र।
राष्ट्रीय अध्यक्ष (मीडिया)
IHRCCO INDIA
8689975743

By प्रथम10तक NEWS

यह वेब न्यूज़ पोर्टल "www.Pratham10taknews.in" प्रोपराइटरशिप फर्म मनोज वर्मा के अधीन संचालित हो रहा है। इस वेब न्यूज़ पोर्टल के मालिक व संपादक MANOJ VERMA (प्रथम 10तक न्यूज) प्रबंधक - RISHI KUMAR हैं। जो कि विगत 20 वर्षों से अधिक समय तक वे मीडिया - प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, में अपनी सेवाएं दिए हैं। सन 2003 से इलेक्ट्रॉनिक मीडिया से जुड़े हैं अधीन मासिक पत्रिका छत्तीसगढ़ पंचायत टुडे न्यूज़ का प्रकाशन कर रहे हैं साथ ही इस वेब न्यूज़ पोर्टल के माध्यम से विभिन्न समाचारों का प्रकाशन कर बड़े पैमाने पर लोगों तक पहुंचा रहे हैं और यह कार्य आगामी दिनों में भी सभी के आशीर्वाद से जारी रहेगा ऐसा उम्मीद है। Disclaimer : किसी भी तरह के समाचार, विज्ञापन, सूचना आदि के प्रकाशन पर यदि वाद विवाद उत्पन्न होता है इस हेतु रायपुर न्यायालय में ही वाद, विवाद को निपटाया जाएगा साथ ही किसी भी इनफार्मेशन, समाचार इत्यादि के प्रकाशन पर यदि किसी को आपत्ति होती है तो वे सर्व प्रथम संपादक से बात कर मामले का निष्पादन करने का प्रयास करेंगे। CONTACT- 8689975743,8920666012 OFFICE-917713159769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed