समाचार मुंबई महाराष्ट्र प्रथम 10तक न्यूज सहस्त्र चंडी महायज्ञ आणि श्री महादेवी भागवत कथेचें आयोजन मानव कल्याण शक्ती ज्योती फॉउंडेशन ( NGO) संस्थेच्या वतीने मुंबई जवळील नालासोपारा पूर्व प्रगती नगर मोहक सिटी, न्यू लिंक रोड येथे अध्यात्मिक गुरु कालिभक्त कालिपुत्र कालिचरण महाराज जी यांच्या उपस्थितीत सुरु आहे. 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2025 पर्यंत रोज श्री महादेवी कथा सप्ताह असणार आहे. हजारोंच्या संख्येने भाविक रोज सहकुटुंब या धार्मिक कथा महोत्सवात सहभागी होऊन लाभ घेतात. कालीचरण महाराज, जे कालीमाता आणि भगवान शिव (शंकर) यांच्यावरील त्यांच्या अढळ भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत, ते एक प्रमुख संत, हिंदू उपदेशक आणि आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचा प्रभाव धार्मिक शिकवणींपलीकडे पसरलेला आहे कारण ते एक दयाळू प्राणीप्रेमी देखील आहेत, जे भक्तिगीते गाताना त्यांच्या दिव्य आवाजासाठी ओळखले जातात. ते महाराष्ट्रातील अकोला येथील एक आदरणीय धार्मिक नेते आहेत. माँ काली आणि भगवान शिव यांच्यावरील त्यांच्या गाढ भक्तीसाठी प्रसिद्ध असलेले, ते एक प्रतिष्ठित संत, हिंदू धर्मोपदेशक आणि आध्यात्मिक नेते आहेत ज्यांचा त्यांच्या अनुयायांवर खोलवर प्रभाव आहे. कालिपुत्र कालिचरण महाराज कायमच पारंपारिक पोशाखात आध्यात्मिक प्रवचन देतात. कालीचरण महाराज एका अध्यात्मिक मेळाव्यात, सनातन धर्म आणि हिंदू परंपरांबद्दल रूढी, मानव कल्याण समाज सेवा, प्रसार, करत आहेत. मंगलमय पवित्र 108 हवन कुंड महायज्ञ , काली माता पुजन सोहळ्यास ” ब्रह्माण्डनायक ” महानाट्यातील श्री स्वामी समर्थ भूमिका साकारणारे अभिनेते श्री अशोक कुलकर्णी आणि समाजसेवक मुक्ताई फॉउंडेशन अध्यक्ष श्री लव क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शविली आणि दर्शनाचा लाभ घेतला. नंतर कालिपुत्र कालिचरण महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मानव कल्याण शक्ती ज्योती फॉउंडेशनच्या सर्व आयोजकांचे आमंत्रण दिल्याबद्दल आभार व धन्यवाद मानले. मानव कल्याण शक्ति ज्योति फाउंडेशन (NGO)संस्था संपूर्ण धार्मिक महोत्सवाचें अतिशय सुव्यवस्थित आयोजन करत आहे. भक्त श्रीमद् देवी भागवत कथा आणि 108 कुण्डी सहस्त्र चंडी महायज्ञ 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत येऊन ज्यांनी दर्शन घेतलं नाही ते येऊन घेऊ शकतात असं आयोजकांनी सांगितले आहे. या संपूर्ण दैनंदिन संत्संग कथा कार्यक्रमाचे YoutubeLive प्रात्यशिक मानव कल्याण शक्ति ज्योति फाउंडेशन (NGO) संस्था यांच्या यूट्यूब चॅनेल वर पाहता येणार आहे ? ॐ काली जय माता दी मनोज वर्मा (स्वतंत्र) प्रधान संपादक राष्ट्रीय दैनिक शेट्टी टाइम्स समाचार पत्र मुंबई 8689975743 Post Views: 34 Post navigation मुंबई महाराष्ट्र में अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार दिवस के अवसर पर विविध कार्यक्रमों में राष्ट्रीय अध्यक्ष (मीडिया सेल) मान.मनोज वर्मा (स्वतंत्र) हुए शामिल। 138 देशात कार्यरत ब्रह्माकुमारींच्या भव्य-दिव्य कार्यक्रमात आधार इंडियाचे समाजरत्न डॉ. अमित अनंत दुखंडे यांना विशेष VIP स्थानी आदरणीय आमंत्रण!